खेबवडे परमं पुज्य उत्तर वाहिनि दुधगंगा नदीच्या कुशित हळुवारपणे विसावलेलं एक अदर्श गाव म्हणजे खेबवडे गाव होय. तिन्ही बाजुने कागल तालुक्याने व एका बाजुने दुधगंगा नदीने वेढलेल्या कागल- करवीरच्या सरहद्दिवर विसावलेलं करवीर तालुक्यातील एक प्रगल्भ विचारसरणी असलेल गाव म्हणुन प्रसिध्द आहे. विद्याभुषीत आसलेल्या या गावाची लोकसंख्या 4000 च्या आसपास असुन एक बागायतदार गाव म्हणुनही परिसरात प्रचलित आहे.

गावच्या मध्येभागी गावची परंपवीत्र आराध्य देवता श्री विठ्ठलाई देवीचे प्राचीन मंदिर  असुन  ही देवी एक जागृत देवी म्हणुन सर्वांना परिचित आहे. भक्तांच्या मनातील आशा- आकांक्षा पुर्ण करणारी व नवसाला पावणारी देवी म्हणुन सर्वांना परीचीत  आहे. भक्तांच्या हाकेला धावुन जाणारी ही देवता जणु प्राचिन काळापासुन खेबवडे गावचे रक्षण  क‌रत‌ आहे.

इ.स‌. 7 व्या श‌त‌काच्या शिलालेखात‌ ह्या देवीचा अल्लेख‌ जाग‌तिक‌ प्रसिध्द‌ झालेल्या 14 खंडापैकी 13 व्या खंडात‌ उल्लेख‌ आढळ‌तो. इ.स‌. 7 व्या श‌त‌कात‌ कोल्हापुर संस्थानातील‌ एका धार्मीक‌ प‌राक्रमी व‌ प्रसिध्द‌ राजाचा राज‌गुरु हा या देवीचा भ‌क्त‌ होता, राजा त्याला प्रतिभ‌ग‌वान‌ मानीत‌ असे.

राजाची त्याच्याव‌र खूप‌ श्रध्दा व‌ भ‌क्ती होती, त्याच्या  स‌ल्ल्याशीवाय‌ राजाचे पान‌ सुध्दा ह‌ल‌त‌ न‌व्ह‌ते, प‌ण‌ कालांत‌राने द‌रबारातील‌ एका विघ्न‌ संतोषी स‌रदारांच्या सांग‌ण्याव‌रुन‌ हा राजा या गुरुव‌र संताप‌ला. त्याचा अप‌मान‌ म‌नात‌ गिळुन‌ व‌ राग‌ ध‌रुन‌ फिरत‌ फिरत‌ खेब‌व‌डे या गावी आला, येथे त्याच्या अराध्य‌ देवीचे स्थान‌ अस‌ल्यामुळे तो येथेच‌ राहिला व देवीची पुजा अर्चा क‌रु लाग‌ला.

आस‌पास‌च्या घ‌न‌दाट‌ जंग‌लात‌ ब‌सुन‌ देवीचा ज‌प‌-जाप्य‌ क‌रु लाग‌ला, कालांत‌राने हा राज‌गुरु म‌रण‌ पाव‌ला एव्हाना राजाचा सुध्दा गुरु बाब‌त‌चा गैरस‌म‌ज‌ दुर झाला त्याला या गुरुची निध‌नाची बात‌मी कलाली राजाला खुप‌ दु:ख‌ झाले व‌ प‌श्चाताप‌ होऊ लाग‌ला त्यातुन‌ मुक्त‌ उत‌राई होण्यासाठी त्यांने देवीचे छोटे मंदिर बांध‌ले त‌र हे बांध‌काम‌ क‌रणेसाठी क‌रवीर पीठाचे ज‌ग‌दगुरु शंक‌राचार्य‌ यांनी आपल्या माल‌कीची जागा दिल्याची नोंद‌ आहे. काग‌ल तालुक्याचे स‌भोव‌र वेढ‌लेले खेब‌च‌डे हे गाव‌ क‌रवीर तालुक्यातील‌ शेव‌ट‌चे गाव‌ होय‌.

प्राचीन‌ ऐतिहासिक‌  म‌ह‌त्व‌ अस‌लेल्या या गावात‌ ज‌ग‌द्गुरु शंक‌राचार्याचा फार प्रसिध्द‌ म‌ठ‌ होता. या मठाम‌ध्ये ह‌त्ती. घोडै. व‌ 500 च्या व‌र गाई होत्या, त‌र मठाची 50 एक‌र जागा होती. क‌रवीर पीठ‌ शंक‌राचार्यांचा म‌ठ‌ अस‌ल्यामुळे हा मान‌ क‌रवीर तालुक्यालाच‌ ठेव‌ण्यात‌ आला.

आध्यात्माने भ‌रलेल्या या गावात‌ वर्षातुन‌ दोन‌ मोठे उत्स‌व‌ होतात‌ त्यापैकी प‌हिला उत्स‌व‌ मार्च‌- एप्रिल‌ म‌हिन्यांतील‌ धुलीवंद‌नापासुन‌ प्रारंभ‌ होऊन‌ तेथुन‌ पुढे 12 ते 13 दिव‌स‌ हा उत्स‌व‌ साज‌रा केला जातो. या 12 ते 13 दिव‌सात‌ रोज‌ लोक‌नाट्य‌, त‌सेच‌ भ‌ज‌न‌ किर्त‌न‌ असे कार्य‌क्रम‌ घेत‌ले जातात‌ उत्स‌वाच्या शेव‌ट्च्या दिव‌शी कुस्त्यांचे भ‌व्य‌ व‌ दिव्य‌ असे मैदान‌ आयोजीत‌ केले जाते. या मैदानासाठी कोल्हापुर , क‌राड‌, सातारा. इंदौर, दिल्ली पासुन‌चे पैल‌वान‌ कुस्तीसाठी ह‌जेरी लाव‌तात‌ त‌र मैदानासाथी आस‌पास‌च्या प‌रिस‌रातील‌ 20 ते 25 ह‌जार कुस्ती शौकीन‌ या मैदानाचा आस‌वाद‌ घेतात‌.

हे मैदान‌ प्रत्येक‌व‌र्षी खेब‌व‌डे गाव‌चे स‌रपंच‌ व‌ ब‌ल‌भीम‌  तालीम‌ मंडलाचे अध्य‌क्ष‌ श्री. सुभाष‌ ब‌ळ‌वंत‌ चौग‌ले (वाड‌क‌र) हे भ‌रवितात‌, वर्षाला या मैदानात‌ स‌रास‌री 1 लाख‌ ते स‌व्वालाख‌ रुप‌ये ख‌र्च‌ येतो. कुस्तीच्या दुस‌-या दिव‌शी देवीच्या प्रसादाचे वाट‌प‌ केले जाते, या प्रसादाचा आस्वाद‌ घेण्यासाठी आस‌पास‌च्या प‌रिस‌रातुन‌ 50 ते 60 ह‌जार भाविक‌ अत्यंत‌ भ‌क्तिभावाने ह‌जेरी लावुन‌ देवीचे द‌र्श‌न‌ घेऊन‌ तृप्त‌ होतात‌.

दुस‌रा उत्स‌व‌ न‌रात्रोत्स‌व‌ हा देखील‌ मोठ्या प्रमाणात‌ साज‌रा केला जातो. त्याच‌ प्रमाणे आध्यात्माने झ‌पाट‌लेल्या या खेब‌व‌डे गावात‌  श्राव‌ण‌ म‌हिन्यातील‌ प्रत्येक‌ शुक्रवारी पाल‌खी सोहला आयोजित‌ केला जातो.  असा हा आध्यात्म‌क‌, विव्द‌त‌प्रचुर व‌ पुरोगामी विचार स‌रणी अस‌लेला गाव‌, क‌रवीर तालुक्यातील‌  एक‌ आद‌र्श‌ गाव‌, जुन्या अंध‌श्रध्दा टाकुन‌ देवून‌  अध्यात्मिक‌ व‌ आधुनिक‌ विचार स‌रणी स्विकारणा-या  खेब‌व‌डे गाव‌चा क व‌र्ग‌  क्षेत्रामध्ये स‌मावेश‌ क‌रणेत‌ आलेला आहे.